ठाकरे शिवसेनेतर्फे स्वच्छतेत कोकणात प्रथम क्रमांक पटकावलेल्या वेंगुर्ला नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.२१-:
वेंगुर्ले नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नागरिकांच्या सहभागाने वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छतेची सवय लावण्याची महत्त्वपूर्ण काम केले त्यातूनच वेंगुर्ले नगरपरिषद ही स्वच्छता अभियानात देशात कोकणात राज्यात व जिल्ह्यात अव्वल ठरली वेंगुर्ले नगर परिषद हि स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल ठरल्यामुळे संपूर्ण देशात वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छतेचा पॅटर्न चा नावलौकिक झालेला असून देशातील विविध नगरपरिषदा नगरपालिका महानगरपालिका या भेटी देऊन नगर परिषदेच्या कामकाजाचे कौतुक करतात नगरपालिकेच्या या कामामुळे वेंगुर्ला नगर परिषदेचा नावलौकिक झालेला आहे यासाठी प्रत्यक्ष ग्रास रूटला काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना वेंगुर्ले नगर परिषदेवर ठाकरे शिवसेनेची सत्ता येतात कायमस्वरूपी त्यांना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे प्रतिपादन वेंगुर्ले ते माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश निकम यांनी केले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे वेंगुर्ला नगर परिषदेस शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत मिळालेल्या स्वच्छता पुरस्कार हा कोकण विभागातील प्रथम राज्यातृतीय व देशात पंधरावा क्रमांक या स्वरूपाचा आहे वेंगुर्ले नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी ग्रास रूट ला केलेले काम हे वाखाण्याजोगे असल्यामुळेच हा पुरस्कार मिळाला अशा सामाजिक कार्याचे निगडित असलेल्या कामाच्या गौरव ठाकरे शिवसेना ही आपल्या 80 टक्के समाजकारणाच्या माध्यमातून करून प्रोत्साहन देते त्यानुसार आज सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे वेंगुर्णी नगरपालिकेतील ऑफिस स्टॉप मधील व सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संघटिका सुकन्या नरसुले, महिला संघटिका तथा माजी नगरसेविका सुमन निकम, वेंगुर्ले तालुका महिला संघटीका साक्षी चमणकर, वेंगुर्ले नगरपालिकेचे अधीक्षक अभिषेक पाटील, माजी अधिक्षक संगीता कुबल, उभादांडा सरपंच निलेश चमणकर यांच्या व्यासपीठावर समावेश होता.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे पार पडली. या कार्यक्रमात वेंगुर्ला नगरपालिकेतील एकूण 118 जणांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी, सूत्रसंचालन माजी जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक तुषार सापळे यांनी तर आभार माजी नगरसेविका सुमन निकम यांनी मानले.

You cannot copy content of this page