⚡देवगड ता.१६-: प्राथमिक शिक्षक सचिन लक्ष्मण जाधव यांना चेन्नई येथील ग्लोबल ह्युमन पिस युनिव्हर्सिटी कडून नुकतीच डॉक्टर ऑफ एज्युकेशन ही मानद डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले आहे. चेन्नई येथील भारतीय विद्या भवन मध्ये संपन्न झालेय या पदवीदान कार्यक्रमासाठी वियापीठाचे चेअरमन डॉ पी मॅन्युएल, न्यायमूर्ती डॉ व्यंकटेश ,श्री के.संपत कुमार IAS, डॉ के. सुकुमारा ,डॉ. जया शंकर आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी देशभरातून मान्यवर उपस्थित होते. युनिव्हर्सिटी सिनेट मेंबर व भारत स्काऊट गाईड चे नॅशनल कमिशनर डॉ के सुकुमारा यांनी श्री जाधव यांच्या नावाची शिफारस केली होती .
देवगड तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले जाधव सर आपल्या शैक्षणिक कार्यातील योगदानसाठी तसेच कला क्रीडा साहित्य सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जातात. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्ग चे ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत .संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी ,समाज तसेच शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. उपक्रमशील आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख आहे.
शासन स्तरावरील विविध कार्यक्रमांचे उपक्रमांचे आयोजन नियोजन करण्यात राबविण्यात ते हिरहिरीने सहभागी होतात.जनता ,विद्यार्थी वा कर्मचारी यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या स्पर्धा व अभियानात ते सहभागी असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संगीत क्षेत्रात वादक कलाकार म्हणून परिचित असलेले जाधव सर आर्ट सर्कल देवगड चे संस्थापक सदस्य असून या सांस्कृतिक संस्थेकडून संगीत नाटक, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम ,स्पर्धा तसेच सांगीतिक दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांचा हातभार आहे.त्यांची स्व लिखित गाणी आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी शालेय तसेच महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धा मधून सादर झाली आहेत.अनेकदा स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून त्यांनी काम पहिले आहे .
आकाशवाणी सिंधुदुर्गवर, कौशल्याधिष्ठित विकासाची शैक्षणिक पायाभरणी या विषयावर त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिहिलेले लेख ,कविता प्रसिद्ध होत असतात . उच्च शिक्षित तसेच विविध विषयांचा व्यासंग व अनुभव पाठीशी असल्याने ते शिक्षक प्रशिक्षणासाठी राज्य,जिल्हा, तालुका स्तरावर ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करीत आले आहेत .मिळालेल्या या यशाने जबाबदारी वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे .
सध्या देवगड तालुक्यातील केंद्र शाळा देवगड नंबर १ येथे ते कार्यरत असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवगड केंद्रामध्ये बाल आनंद मेळावा , शैक्षणिक चित्रपट आयोजन ,शिक्षकांसाठी अभ्यास दौरा आयोजन या सारख्या शिक्षक व विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्व शिक्षकांसोबत प्रयत्नशील आहेत.
जाधव परिवाराच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात , शिक्षक संघटन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना काही पुरस्कार दिले जातात .त्यांच्या या बहुआयामी कार्याचा बहुमान म्हणून ही मानद डॉक्टरेट देण्यात आली आहे . याचे श्रेय त्यांनी आपले वडील तथा शिक्षक नेते ल. रा. जाधव ,आई , मार्गदर्शक ,कुटुंबीय , सर्व मित्रपरिवार ,विद्यार्थी ,पालक, सहकारी शिक्षक,प्रशासकीय अधिकारी यंत्रणा या सर्वाना दिले आहे ,जाधव यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
श्री सचिन जाधव यांना मानद डॉक्टरेट प्रदान…
