⚡सावंतवाडी ता.१६-: विद्युत वाहिनीला सलग दोन वर्ष शॉर्टसर्किट होऊन आंबा व काजू बागेला आग लागून संपूर्ण बाग जळून खाक झाली. मात्र, अद्यापपर्यंत शासनाकडून एकही रूपयांची नुकसानभरपाई न मिळाल्याने केशव चौकेकर व आपा चौकेकर यांनी महावितरण कार्यालय सावंतवाडी समोर आमरण उपोषण छेडल आहे.
श्री. चौकेकर यांच म्हणणं आहे की, २९ फेब्रुवारी २०२४ तसेच ६ मे २०२५ रोजी शॉर्टसर्किट होऊन आमच्या ५ एकर आंबा व काजू बागेच नुकसान झालं. कलमांसह बाग शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाली. मात्र, तीन वर्ष होऊनही अद्यापपर्यंत आम्हाला एकही रूपया नुकसानभरपाई मिळालेली नाही. जवळपास ९० लाखांच नुकसान या दोन वर्षांत आमच घडलं असून केवळ १ लाख ८७ हजार रूपयांची मदत महावितरणकडून देण्याच आश्वासन दिल जात आहे. या तुटपुंज्या नुकसानभरपाईत पुन्हा बागायत उभी करण देखील मुश्किल आहे. उपजीविकेचे एकमेव साधन शेती असल्याने एकतर नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा, महावितरणमध्ये नोकर द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जीर्ण झालेल्या विद्युत यंत्रणेला वारंवार अपघात होऊन आमचे नुकसान होत असल्याने ही यंत्रणा इतर मार्गाने वळविण्यात यावी अशी मागणी श्री. चौकैकर यांच्याकडून करत आमरण उपोषण छेडण्यात आले आहे.
