⚡सावंतवाडी,ता.०१-:
कवठणी गावचे सुपुत्र, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश श्रीधर कवठणकर (वय ६५) यांचे शनिवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रकाश कवठणकर यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. सर्वसामान्य नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, विकासकामांप्रती असलेली तळमळ आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे त्यांनी जनमानसात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे कवठणीसह संपूर्ण सावंतवाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
प्रकाश कवठणकर यांचे निधन…
