कुडाळ मध्ये हॉस्पिटलच्या जनरेटरला आग…

वेळीच आग विझविल्याने अनर्थ टळला..

कुडाळ : कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक येयील एका खासगी रुग्णालयाचा जनरेटरमधून सोमवारी सायंकाळी अचानक धूर येऊ लागल्याने लागलीच न.पं. आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. मात्र तत्पूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सिलेंडरच्या सहाच्याने आग विझविली. तसेच एमआयडिसी व कुडाळ नगरपंचायतीचे अग्नीशमक बंब घटनास्थळी दाखल झाले.
जनरेटरला शॉटसर्किट मुळे लागलेली आग वेळीच विझविण्यात आली. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
हि घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. यावेळी संबंधित यंत्रणेची तारांबळ उडाली. नागरीकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
रुग्णालयाच्या बाहेर जनरेटर सुरक्षित ठिकाणी लावण्यात आलेला असून लाईट नसल्याने तो सुरू होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक धूर येऊ लागला. लागलीच कर्मचाऱ्यांनी सिलेंडरचा वापर करून आग विझवली. पण दक्षता म्हणून आधीच एमआयडिसी व कुडाळ नगरपंचायत अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले होते. दोन्ही बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एमआयडिसी पथकाने जनरेटर ठिकाणी जात पाणी मारून अग विझल्याची खात्री केली.

You cannot copy content of this page