रोटरी आयडीयल स्टडी ॲप दिशादर्शक…

अलंकार तायशेटये:डोंबिवली सनसिटी आणि सिंधुदुर्ग रोटरी परिवार कडून ॲपचे वितरण..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी आयडीयल ॲप दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी चे प्रोजेक्ट चेअरमन अलंकार तायशेटये यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग रोटरी परिवारातील ११ क्लब एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतशय उपयुक्त रोटरी आयडीयल स्टडी ॲपचे वितरण कुडाळ तालुक्यातील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथे करण्यात आले. यावेळी अलंकार तायशेटये यांनी मार्गदर्शन केले.
.यावेळी गव्हर्नर एरिया एड डाॅ.विद्याधर तायशेटये,असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने ,असिस्टंट गव्हर्नर डाॅ विनया बाड, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, खजिनदार राकेश म्हाडदळकर, गजानन कांदळगावकर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटीचे सेक्रेटरी अजय जैन,खजिनदार विजय वोझाला,शैलेश पटेल,प्राॅस्पेक्टिव्ह सदस्य प्रकाशभाई, साळगाव संस्था चेअरमन मुकुंद धुरी,मुख्याध्यापक तकिलदार सर, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्ष ॲड सिध्दार्थ भांबुरे, सचिव सिताराम तेली, रोटरी क्लब ऑफ बांदा अध्यक्ष शिवानंद भिडे, सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ मुख्याध्यापक अनिल होळकर, तळगाव हायस्कूल चे प्रविण खोचरे, आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार यांनी कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील ५०० दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी आयडीयल स्टडी ॲपचा लाभ देणार असल्याचे सांगतिले. तर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे गव्हर्नर एरिया एड डाॅ.विद्याधर तायशेटये यांनी रोटरी आयडीयल स्टडी ॲपचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ हजार दहावीच्या विद्यार्थ्यांना देणार असल्याचे मनोदय व्यक्त केला.
रोटरी आयडीयल स्टडी ॲपचे निर्माते अमोल कामत यांनी विद्यार्थ्यांना ॲपची सविस्तर माहिती सांगितली. हे ॲप कोणत्याही मोबाईल मध्ये घेता येणार आहे. मराठी, सेमी, इंग्रजी माध्यमात ॲप उपलब्ध आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त सराव प्रश्नसंच, अभ्यासक्रम, कृतिपत्रिका,नोटस, महत्वाचे प्रश्न, एमसीक्यूज, करिअर मार्गदर्शन अशा विविध घटकांचा लाभ थेट विद्यार्थ्याला घेता येणार आहे. हे ॲप दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीला ३०० ॲप,रोटरी क्लब ऑफ बांदा ३०० ॲप, रोटरी क्लब ऑफ कुडाळ ४०० ॲप वितरित करण्यात आली. यावेळी साळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक तकिलदार सर यांनी सर्वांचे आभार मानले तर सूत्रसंचालन असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांनी केले.

You cannot copy content of this page