Headlines

Global Maharashtra Breaking News

कट्टा येथे ‘गणितोत्सव २०२५-२६’ उत्साहात…

⚡मालवण ता.२५-:दैनंदिन जीवनात गणिताचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गणितीय संकल्पना शालेय स्तरावरच पक्क्या होण्यासाठी गणितोत्सवसारख्या उपक्रमांची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये केवळ बक्षीस मिळवण्यासाठी नव्हे, तर आपल्यातील ज्ञानाची परिपूर्णता तपासण्यासाठी सहभागी व्हावे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्री सुधीर वराडकर यांनी येथे बोलताना केले कट्टा येथील कट्टा…

Read Full News

इन्सुली येथे तिलारी कालवा प्रकल्पातील पाईपांना आग…

कारण अस्पष्ट: घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी.. ⚡सावंतवाडी ता.२५-: इन्सुली येथे तिलारी कालवा प्रकल्पांतर्गत कॅनॉलसाठी ठेकेदाराने डंप करून ठेवलेल्या पाईपांना आज दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठा भडका उडाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा बंबही पाचारण…

Read Full News

आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये यशश्री सौदागर, अपर्णा सातोसकर यांचा सन्मान…

⚡सावंतवाडी ता.२५-: लोक कल्याण शिक्षण संस्था संचलित,आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल या प्रशालेच्या वतीनेकै. गुरुवर्य रा. गो.सामंत यांच्या ३३ व्या. स्मृतिदिनाचे औचित्य साधून आजगाव सरपंच, यशश्री सौदागर व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांचा त्यांच्या कार्याबद्दल शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह ,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सौदागर व सातोसकर यांनी प्रशालेचे आभार व्यक्त करून प्रशालेच्या…

Read Full News

वेंगुर्ला उभादांडा येथील प्रसिद्ध श्री गणपतीचे उद्या विसर्जन…

⚡वेंगुर्ला ता.२५-: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा वाघेश्वरवाडी येथे आज बुधवार 25 फेब्रुवारी रोजी म्हामणे होणार आहे. दुपारी १.३० वाजल्यापासून महाप्रसाद सुरू होणार आहे. तसेच गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री देव गणपती मंदिर देवस्थान उभादांडा येथून स्वयंभू श्री वाघेश्वर मंदिराकडून भजने…

Read Full News

एसओएफ नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये मिलाग्रीस हायस्कूलचा झेंडा फडकला…

⚡सावंतवाडी ता.२५-: एस.ओ.एफ.नॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या एकूण सात विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.यामध्ये कु.सिताराम मेस्त्री- इयत्ता दुसरी, कु.संस्कृती गावकर- इयत्ता तिसरी, कु.चिदानंद रेडकर- इयत्ता सातवी, कु.आदिल शेख- इयत्ता सातवी, कु.पुष्कर गावडे-इयत्ता सातवी, कु.हर्ष राऊळ-इयत्ता आठवी व करुणा बाईत- इयत्ता नववी या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीम.रोजा फर्नांडिस, श्रीम.उर्मिला…

Read Full News

इन्सुली कोठावळे बांध येथील नवीन पुलाचे काम सुरू असताना डंपरची पुलाला धडक…

सुदैवाने काही नुकसान नाही:इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ आक्रमक.. ⚡बांदा ता.२५-: इन्सुली सुतगिरण माडभाकर कोठावळे बांध रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहे परंतु रात्री अचानक इन्सुली येथील डांबर प्लांट वरून जाणाऱ्या डंपरने अचानक तिथे बांधकाम सुरू असलेल्या पुलाला धडक दिली सुदैवाने काही नुकसान झाले नाही पण लोकांच्या भावना पुलाला धक्का बसला म्हणून एक…

Read Full News

सेंटलुक्स हॉस्पिटल जागेचा उपयोग ‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ उभारणीसाठी व्हावा ;

वेंगुर्ला नगरपरिषद सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर. ⚡वेंगुर्ला ता.२५-:वेंगुर्ला शहरातील ऐतिहासिक ‘सेंटलुक्स हॉस्पिटल’ अनेक दशके कोकणच्या आरोग्य सेवेचा कणा राहिले आहे. सद्यस्थितीत हे रुग्णालय बंद असल्याने वेंगुर्ला शहर व ग्रामीण भागातील जनतेला उपचारांसाठी गोवा किंवा कोल्हापूर यांसारख्या दूरच्या ठिकाणी जावे लागते, ज्यामुळे अनेकदा रुग्णांचे प्राण धोक्यात येतात. जर मूळ संस्था (COEMAR किंवा त्यांचे भारतीय प्रतिनिधी) हे…

Read Full News

अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या…

आमदार दीपक केसरकर: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे वेधले निवेदनद्वारे लक्ष.. ⚡सावंतवाडी, ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमदार केसरकर यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व…

Read Full News

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गव्याचा शिरकाव…

⚡बांदा ता.२४-: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दि. २४ रोजी रात्री आठ वाजता गव्याने प्रवेश केला. अनेक जंगली जनावरे आता लोकवस्तीमध्ये घुसू लागली आहेत. त्यात गव्यांचा कळप मोठ्या प्रमाणात शेती, बागायतीमध्ये घुसून नासधूस करत असतानाच मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा येथे गव्याने प्रवेश केल्यामुळे एकच खळबळ माजली. तेथील कर्मचाऱ्यांनी गव्याला बाहेर हाकलून दिले. यामुळे काही काळ…

Read Full News

वायंगणी उपसरपंचपदी भाजपच्या अनंत केळजी यांची‌ बिनविरोध निवड..

वेंगुर्ला तालुका भाजपच्या वतीने सन्मान.. वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या अनंत सीताराम केळजी यांची‌ बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच रवींद्र धोंड यांनी 9 जानेवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर आजमंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.सरपंच अवी दुतोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली व अध्यासी अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी मधुकर नवार यांच्या उपस्थितीत ही बिनविरोध…

Read Full News

You cannot copy content of this page