Headlines

“सावंतवाडीतील बाहेरचावाड्यात कामगाराचा संशयास्पद मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१५-: शहरात एका व्यक्तीचा चाकूने गळ्यावर वार करत स्वतःच जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.‌तर ही आत्महत्या नसून घातपात असल्याचही बोलल जातंय. संबंधित व्यक्ती ही परप्रांतीय असून आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. .

सावंतवाडी बाहेरचावाडा येथे ही घटना घडली. भाड्याच्या घरात हे तीन कामगार राहत होते. दारूच्या नशेत झालेल्या वादातून यातील एका कामगारान गळ्यावर चाकूने वार करत जीवन संपवल्याच बोलल जात असून घातपाताचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी चौकशीसाठी दोघा कामगारांना ताब्यात घेतले आहे. मृत कामगाराचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यूपीतील हे तीन कामगार असून आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page