Headlines

“केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार निलेश लंके यांनी दिल्या विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी, ता. १५-: भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा आज ३८ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवसाचा कोणताही मोठा उत्सव न करता तो साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय विशाल परब यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त विशाल परब यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी पत्राद्वारे विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला पुढील काळातही यश मिळावे, अशा सदिच्छा या शुभेच्छांमधून व्यक्त करण्यात आल्या.

दुष्काळी परिस्थितीत वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचा घेतलेला निर्णय हा सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरत आहे.”

You cannot copy content of this page