सावंतवाडी: येधील इंदिरा गांधी संकुलातील भगवान महावीर दवाखान्यात येत्या दोन दिवसात वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) उपलब्ध होतील, असे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला दिले.
1 आँक्टोबर 2026पासून नगरपालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. विशेषतः बि.पी., शुगर आदी पेशंटना नियमित उपचार, औषधे घ्यावी लागतात. पण डॉक्टर नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा मुद्दा अभिनव फाऊंडेशन ने प्रकर्षांने मांडला. यासंदर्भात श्री.औंधकर म्हणाले, नगपालिकेच्या दवाखान्याच्या जागेत नागरी आरोग्य वधिँनी केंद्र सुरु होणार आहे..

