Headlines

नवरात्रौत्सवनिमित्तवेंगुर्ला शिवसेनेमार्फत उद्यापासून विविध कार्यक्रम

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुका
शिवसेनेमार्फत नवरात्रौत्सव 2026 निमित्त
शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वा.
सत्यनारायण महापुजा चे आयोजन करण्यात आले असुन आरती व तीर्थप्रसाद,
सायंकाळी 6 ते 11 वा.
अभंग महिला भजन मंडळ, कुडाळ, चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, सुरंगपाणी वायंगणी,
श्री देव सिद्धेश्वर भजन मंडळ, कोंडुरा, जनसेवा भजन मंडळ, परबवाडा वेंगुर्ला आदी नामवंत संगीत भजन मंडळाची भजने होणार आहेत. शनिवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा.
अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा
‘दैव जाणिले कुणी’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. रविवार दि. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा. श्वेतसखी फुगडी ग्रुप वेंगुर्ला यांचा फुगडी कार्यक्रम, रात्रौ 8 वा.
होममिनिस्टर कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा. जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपसभापती सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत
गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न होणार असुन
रात्रौ 8 वा. राम कृष्ण हरी संगीत संस्कार गुरुकुल तेंडोली यांचा प्रभुरंग हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नागरिकांनी व शहरवासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी व शहरप्रमुख अजित राऊळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page