इन्सुली येथे तिलारी कालवा प्रकल्पातील पाईपांना आग…

कारण अस्पष्ट: घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी..

⚡सावंतवाडी ता.२५-: इन्सुली येथे तिलारी कालवा प्रकल्पांतर्गत कॅनॉलसाठी ठेकेदाराने डंप करून ठेवलेल्या पाईपांना आज दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठा भडका उडाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा बंबही पाचारण करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणेकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page