कट्टा येथे ‘गणितोत्सव २०२५-२६’ उत्साहात…

⚡मालवण ता.२५-:
दैनंदिन जीवनात गणिताचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गणितीय संकल्पना शालेय स्तरावरच पक्क्या होण्यासाठी गणितोत्सवसारख्या उपक्रमांची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये केवळ बक्षीस मिळवण्यासाठी नव्हे, तर आपल्यातील ज्ञानाची परिपूर्णता तपासण्यासाठी सहभागी व्हावे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्री सुधीर वराडकर यांनी येथे बोलताना केले

कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गणित विभागामार्फत ‘गणितोत्सव २०२५-२६ चे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष श्री. सुधीर उर्फ बापू वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. महेश भाट, गणित विषय विभागप्रमुख श्री. प्रकाश कानूरकर, सौ. वीणा शिरोडकर आणि कु. अमिषा परब यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी श्री प्रकाश कानूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले

या गणितोत्सवांतर्गत गणितीय निबंध स्पर्धा, गणितीय रांगोळी स्पर्धा, पाढे पाठांतर स्पर्धा आणि गणितीय प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळीच्या माध्यमातून भूमितीय आकार आणि निबंधातून गणिताचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले. पाढे पाठांतर स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली तर विद्यार्थ्यांच्या मूलभूत गणितीय संकल्पना पक्क्या व्हाव्यात आणि त्यांच्यातील भीती दूर व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

या महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन गणित विभाग प्रमुख श्री. प्रकाश कानूरकर, सौ. वीणा शिरोडकर आणि कु. अमिषा परब यांनी केले. या स्तूत्य उपक्रमाला संस्था पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी भूमितीय आधारावर आयोजित केलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे वराडकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले

You cannot copy content of this page