आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये यशश्री सौदागर, अपर्णा सातोसकर यांचा सन्मान…

⚡सावंतवाडी ता.२५-: लोक कल्याण शिक्षण संस्था संचलित,आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल या प्रशालेच्या वतीने
कै. गुरुवर्य रा. गो.सामंत यांच्या ३३ व्या. स्मृतिदिनाचे औचित्य साधून आजगाव सरपंच, यशश्री सौदागर व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांचा त्यांच्या कार्याबद्दल शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह ,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना सौदागर व सातोसकर यांनी प्रशालेचे आभार व्यक्त करून प्रशालेच्या प्रगती साठी आपण नक्कीच सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत व शिक्षक वर्ग ,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page