वेंगुर्ला उभादांडा येथील प्रसिद्ध श्री गणपतीचे उद्या विसर्जन…

⚡वेंगुर्ला ता.२५-: संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा वाघेश्वरवाडी येथे आज बुधवार 25 फेब्रुवारी रोजी म्हामणे होणार आहे. दुपारी १.३० वाजल्यापासून महाप्रसाद सुरू होणार आहे. तसेच गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री देव गणपती मंदिर देवस्थान उभादांडा येथून स्वयंभू श्री वाघेश्वर मंदिराकडून भजने व आरती झाल्यानंतर श्री स्वयंभू सागरेश्वर मंदिर येथे आरती झाल्यावर स्वयंभू श्री देव सागरेश्वर महासागर किनारी ढोल ताशाच्या भजनाच्या इतर वाद्यांच्या गजरात “श्रींच्या” मूर्तीचे, सागर किनारी महाआरती झाल्यानंतर विसर्जन होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी तीर्थप्रसादाचा भजनाचा व विसर्जन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page