मालवण दि (प्रतिनिधी) :

कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून भरड, मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिराच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
स्पर्धकांनी स्वतःची स्वरचित कविता सादर करणे आवश्यक आहे. कविता मराठी किंवा मालवणी भाषेत असावी. कवितेसाठी विषयाचे कोणतेही बंधन नसून, कविता २५ ओळींपर्यंत मर्यादित असावी. प्रथम येणाऱ्या २० स्पर्धकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली स्वरचित कविता २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत श्री शिवाजी वाचन मंदिर, भरड, मालवण या पत्त्यावर पाठवावी किंवा समक्ष आणून द्यावी. निवड झालेल्या स्पर्धकांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. निवड झालेल्या स्पर्धकांची स्पर्धा २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता घेण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना पुढीलप्रमाणे रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत :
प्रथम क्रमांक : १,५०० रुपये
द्वितीय क्रमांक : १,००० रुपये
तृतीय क्रमांक : ७५० रुपये
उत्तेजनार्थ प्रथम : ५०० रुपये
उत्तेजनार्थ द्वितीय : ३०० रुपये
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व कवींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी कवितेच्या खाली आपला पूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक लिहावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९४२२०५४६०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री शिवाजी वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
