बांदा दशक्रोशीत पावसाची जोरदार हजेरी …
*ð«बांदा दि.१९-:* शुक्रवारी संध्याकाळी बांदा दशक्रोशीत मेघगर्जनांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. आंबा काजूच्या ऐन हंगामात पाऊस आल्याने बागायतदारांवर अस्मानी संकट निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बांदा शहरात बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे अर्धातास झालेल्या पावसामुळे रहदारी मात्र थांबली होती. गेले चार दिवस सावंतवाडी तालुक्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. येत्या दोन दिवसांत…
