*💫सावंतवाडी दि.१९-:* छत्रपती शिवरायांच्या भव्य रॅलीनंतर राजवाडा परिसरात स्वराज्य संघटनेतर्फे कार्यकर्त्यांसाठी चहा फराळाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.त्यामुळे राजवाडा परिसरात डिश, पाण्याच्या बाटल्या, चहा कप, पेपर हे ज्या ज्या ठिकाणी पडले होते. ते सर्व व कचरा स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते संजू विरनोडकर व शिवप्रेमी युवकांनी गोळा करून एकत्र ठेवला. स्वच्छता अभियानात हे सेवाभावी कार्य केल्याबद्दल संस्थान विश्वस्ताकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. यावेळी स्वराज्य चे अँड राजू कासकर, साईप्रसाद सावंत, अमोल साटेलकर, अतुल केसरकर, सुशांत पाटणकर व पदाधिकाऱ्यांनी संजू विरनोडकर व युवकांचे आभार मानले. व श्रीमंत संस्थान सावंतवाडी यानी केलेल्या सहकार्याबद्दल स्वराज्य व शिवप्रेमींतर्फे आभार मानले आहेत.
स्वराज्य संघटनेच्या शिवप्रेमींनी ठेवला स्वच्छतेचा आदर्श
