” प्रीतम” च्या टीमचा क्रिक्रेट च्या मैदानावर प्रमोशन षटकार…

संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रिक्रेट स्पर्धेतून केले प्रीतम चे प्रमोशन

*💫कणकवली दि.१९-:* मालवणी प्रेमाचा तडका असलेल्या प्रीतम या मराठी सिनेमाची टीम थेट क्रिक्रेटच्या मैदानावर दाखल झाली. संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित भव्य क्रिक्रेट स्पर्धेला भेट देत ” प्रीतम ” च्या टीमने प्रीतम च्या प्रमोशन चा षटकार खेचला. आज रिलीज झालेल्या प्रीतम सिनेमातील अभिनेता प्रणव रावराणे , विश्वजित पालव यांनी थेट संदीप मेस्त्री मित्रमंडळच्या वतीने आयोजित जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या वरवडे – फणसनगर येथील भव्य क्रिक्रेट स्पर्धेच्या मैदानात जात क्रीडारसिकांना सुखद धक्का दिला. यावेळी लाईन प्रोड्युसर साईनाथ जळवी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले. यावेळी पं स सदस्य मिलिंद मेस्त्री,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page