बांद्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…

*💫बांदा दि.१९-:* श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव बांद्य‍ात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बांदा शहर व निमजगा वाडीत गाड्या व रस्त्यांवर लावण्यात आलेल्या भगव्या झेंडे व पताक्यांमुळे संपुर्ण बांदा शहर भगवेमय झाले होते. बांदात विविध मंडळांनी बांदेश्वर मंदिर अशी शिव रॅली काढली. यावेळी महिलांनी पारंपरिक साड्या व पुरुष मंडळींनी परिधान केलेले भगवे सदरे यामुळे वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. श्री बांदेश्वर मंदिर, निमजगा येथील शिवप्रतिष्ठान मंडळ, श्री छत्रपती शिवाजी चाैक, मोर्येवाडा आदी ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरात चारचाकीवरुन ढोल ताशाच्या गजरात, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी बांदा परिसर शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला. कोरोनासंकटात शासनाचे मास्क, सोशल डिस्टन्सं आदी नियमांचे पालन करत शिवसैनिकांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.

You cannot copy content of this page