वाफोली मंदिराच्या बांधकामासाठी निधी देण्याचे मान्य…

प्रस्ताव सादर करण्याच्या पश्चिम देवस्थान समिती अध्यक्षांकडून सुचना

*💫बांदा दि.१९-:* वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी निधी दिला जाईल. त्यासाठी रीतसर प्रस्ताव करण्याच्या सुचना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांनी वाफोली देवस्थान समितीला दिल्या. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरच्या पदाधिकार्‍यांनी वाफोली मंदिराला मंगळवारी भेट देत मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या सुबक बांधकाम व चोख आर्थिक व्यवहाराबाबत अध्यक्ष महेश जाधव यांनी वाफोली देवस्थान समितीचे कौतुक केले. वाफोली देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य संगिता खाडे, बसनगोंडा पाटील, प्रमोद पाटील, शिवाजीराव जाधव, सुभाष वोरा, विजय पोवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page