*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालण्यात आला. यावेळी शिवप्रेमीनी अश्वारूढ पुतळा परिसर फुले, भगवे झेंडे ,रांगोळी आणि शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने गज बजून गेला होता. अनेक शिवप्रेमीनी अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार घातला. शासनाने युगपुरुष शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्याचे शासन आदेश निर्गमित केले आहेत, त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 27 साली झाला यावरून बहुतेक इतिहास संशोधकांनी आणि शासनाने 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करून या दिवशी जयंती साजरी करण्याचे ठरविले. गेली अनेक वर्षे 19 फेब्रुवारी दिवशी शासनाच्या वतीने शिवजयंती साजरी केली जाते या वर्षी 391 शिवजयंती साजरी होत असून ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी सकाळी जिल्हाधिकारी के .मंजू. लक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे .सह कर्मचारी, पोलीस ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान च्या माध्यमातून आकर्षक रोषणाई फटाक्यांची आतषबाजी सजावट रांगोळी भगवे ध्वज बांधून परिसर सजविण्यात आला होता यानंतर येथील महिला शिवसेना ग्रुप, युवा सेना, हिंद भारती य जनरल कामगार सेनेच्या वतीने पुष्पहार घालून शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. यानिमित्त विविध शिवाजी महाराजांचे पोवाडे ,गीत गायन व विविध कार्यक्रमाने परिसर दुमदुमून गेला होता . तसेच जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य शासकीय कार्यालय, ग्रामपंचायती येथे शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आल्या होत्या.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवजयंती साजरी
