विलवडे येथे शिवजयंती साजरी….

*💫बांदा दि.१९-:* दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी ग्रामिण बिगर पतसंस्था मर्यादित, विलवडे येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रस्त्यांवर लावण्यात आलेल्या भगव्या झेंडे व पताक्यांमुळे परिसरात भगवेमय वातावरण पहायला मिळाले. पतसंस्था अध्यक्ष विलास गावडे यांनी शिवप्रतिमेला हार अर्पण करून दिप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी गावातील मुख्य रस्त्यावरुन शिव रॅली काढली. यावेळी पारंपरिक वेषभूषात पुरुष मंडळींनी परिधान केलेले भगवे सदरे यामुळे तेजोमय वातावरण निर्माण झाले होते. दुचाकी, चारचाकीवरुन ढोल ताशाच्या गजरात, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी विलवडे परिसर शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला. यावेळी सरपंच दिनेश दळवी, माजी सभापती विनायक दळवी, सहदेव दळवी, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर दळवी, आनंद दळवी, प्रकाश दळवी, व्यवस्थापक सोनु दळवी, महेंद्र दळवी, प्रमोद दळवी, तसेच विद्यार्थी, गावातील शेकडोच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थिती होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page