Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला आगाराचे वाहक शंकर सावंत सेवानिवृत्त…

*💫वेंगुर्ला दि.२८-:* वेंगुर्ला आगारातील वाहक शंकर सावंत हे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा चालक, वाहक यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. अहोरात्र सेवा बजावणारे, इंटक संघटनेचे कट्टर व धडाडीचे कार्यकर्ते अशी सावंत यांनी आपली ओळख निर्माण केली होती. आज ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला आगार…

Read Full News

होळीच्या सणाला आवास योजनेतील घरांचा ताबा देणार : संजय घोगळे….

*💫वेंगुर्ला दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील अद्यापपर्यंत ४०७१ घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०२१ पर्यंत १९९९ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना होळीच्या सणाला घरकुलांचा ताबा देण्याचा मानस महा आवास अभियान – ग्रामीण कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात महा आवास अभियानाची अंमलबजावणी जोरदार…

Read Full News

*टेनिस बॉल नगराध्यक्ष चषकावर एल एस एस नेमळे संघाने कोरले नाव

*तर आदि आर्यन देवली संघ उपविजेता* *💫सावंतवाडी दि२८-:* सावंतवाडी जिमखाना मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य टेनिस बॉल नगराध्यक्ष क्रिकेट चषकावर एल एस एस नेमळे संघाने नाव कोरले आहे. तर आदि आर्यन देवली संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात नेमळे संघाने उत्कृष्ट अशी गोलदाजीच्या जोरावर ८ धावांनी विजय मिळवला…

Read Full News

लाकूड कारखानदार मोहन वराडकर यांचे निधन…

*💫मालवण दि.२८-:* मालवण शहरातील मक्रेबाग येथील प्रसिध्द लाकूड कारखानदार मोहन श्रीधर वराडकर (वय८१) यांचे रविवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. मातृत्व आधार फाऊंडेशनचे संचालक संजय उर्फ बंटी आणि सुनील वराडकर यांचे वडील होत. मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Read Full News

मालवणात मनसेतर्फे मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा….

*💫मालवण दि२८-:* मराठी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती निमित्त व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मालवणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यावतीने आज मालवण शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच मालवण मध्ये सर्व अनेक दुकानधारकांना व व्यापाऱ्यांना राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे व व्यवहारात जास्तीत जास्त मराठी वापरण्यास…

Read Full News

*मालवण पंचायत समितीच्या वतीने ऐतिहासिक स्थळे स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

आज पासून रामगड येथे स्वच्छता मोहीम राबवत करण्यात आला शुभारंभ *💫मालवण दि.२८-:* मालवण पंचायत समितीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मालवण तालुक्यातील ‘ऐतिहासिक स्थळे’ स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आज रविवारी सकाळी रामगड येथील किल्ले रामगड येथे स्वच्छता मोहिमेने करण्यात आला. मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या शासकीय नियमावलीचे पालन करून मोहीम राबविण्यात आली. एकाचवेळी…

Read Full News

जि.प.केंद्रशाळा मसुरे नं.१ येथे मराठी राजभाषा दिन साजरा संपन्न

*💫मालवण दि.२८-:* मराठी राजभाषा दिनानिमित्त श्री. दाजीसाहेब प्रभूगावकर जि.प, पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मसुरे नं.१ या शाळेत विद्यार्थ्यांच्या कविता व कथा सादरीकरण, मराठी गीतगायन, समूहगीत गायन, अभंग गायन सादरीकरण करण्यात आले. तर राजभाषा दिनाचे औचित्य साधून मुलांनी स्वत: लिहिलेल्या कथा, कविता तसेच संग्रहित लेखांचे “अभ्युदय” हे हस्तलिखित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती…

Read Full News

जिलेटिन सारख्या स्फोटकाच्या स्फोटात दोन युवक जखमी

*चक्क मुकादमने मणेरी येथे दिले फेकून* *💫दोडामार्ग दि२८सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून अनेक अप्रिय घटना घडत असून आज जिलेटिन सारख्या स्फोटकाच्या स्फोटात दोन परप्रांतीय युवक जखमी झाले आहेत. त्यांना मणेरी या ठिकाणी मुकादमने आणून रस्त्याच्या बाजूला फेकले. ही गोष्ट शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांना समजताच त्यांनी लागलीच त्याठिकाणी जात उपतालुकाप्रमुख…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यातील एकतरी खेळाडू भारतीय संघात निश्चित खेळेल

*आमदार राम कदम यांनी व्यक्त केला विश्वास* सावंतवाडी-: नगरपरिषद तर्फे जिमखाना मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेत आज आमदार राम कदम यांनी भेट दिली होती यावेळी त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एकातरी खेळाडूची निवड भारतीय संघात निश्चित होईल असा विश्वास त्यांनी…

Read Full News

*येणाऱ्या काळात सावंतवाडी विधानसभेत भाजपचाच आमदार

*आमदार राम कदम यांनी व्यक्त केला विश्वास* सावंतवाडी-:सावंतवाडी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या काळात भाजपचाच आमदार असणार असून, येणाऱ्या काळात भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार असल्याचा विश्वास आमदार राम कदम यांनी व्यक्त केला आहे.

Read Full News

You cannot copy content of this page