आज पासून रामगड येथे स्वच्छता मोहीम राबवत करण्यात आला शुभारंभ
*💫मालवण दि.२८-:* मालवण पंचायत समितीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मालवण तालुक्यातील ‘ऐतिहासिक स्थळे’ स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आज रविवारी सकाळी रामगड येथील किल्ले रामगड येथे स्वच्छता मोहिमेने करण्यात आला. मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या शासकीय नियमावलीचे पालन करून मोहीम राबविण्यात आली. एकाचवेळी जास्त गर्दी होऊ नये यादृष्टीने लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी व कर्मचारी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली. किल्ल्यावर उभ्या स्वरूपात असलेल्या सात तोफांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती बागवे, विस्तार अधिकारी पी.डी. जाधव, श्री. गोसावी, श्री. कांबळे, रामगड सरपंच विलास घाडीगांवकर, उपसरपंच अमित घाडीगांवकर, असगणी सरपंच हेमंत पारकर, आडवली सरपंच श्री. आडवलकर, ग्रामसेवक श्री. दळवी, श्री. सावंत, समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गचे कमलेश गोसावी, शिवमुद्रा संग्रहालय मालवणचे संचालक उदय रोगे, स्वराज्य संघटना सिंधुदुर्गचे साईश माशेलकर, प्रथमेश वेरलकर व अन्य सदस्य स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी सामाजिक बांधिलकीतुन एक सामाजिक उपक्रम म्हणून मालवण पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांच्या साफसफाईचा उपक्रम निश्चित करण्यात आला आहे. तालुक्यातील अन्य किल्ले व कातळशिल्प येथेही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.काही ऐतिहासिक स्थळे आज दुर्लक्षित आहेत, मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यांचे जतन व संवर्धन काळाची गरज असल्याचे सांगितले.
