*💫मालवण दि.२८-:* मराठी राजभाषा दिनानिमित्त श्री. दाजीसाहेब प्रभूगावकर जि.प, पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मसुरे नं.१ या शाळेत विद्यार्थ्यांच्या कविता व कथा सादरीकरण, मराठी गीतगायन, समूहगीत गायन, अभंग गायन सादरीकरण करण्यात आले. तर राजभाषा दिनाचे औचित्य साधून मुलांनी स्वत: लिहिलेल्या कथा, कविता तसेच संग्रहित लेखांचे “अभ्युदय” हे हस्तलिखित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत, बागवे हायस्कुल मुख्याध्यापक श्री.किल्लेदार, मसुरे देऊळवाडा शाळा मुख्याध्यापक प्रशांत पारकर, शिक्षक विनोद कदम, सौ.अर्चना कोदे, श्री.गावकर, श्री.पंडित चौधरी सर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर सर, गोपाळ गावडे, पदवीधर शिक्षक विनोद सातार्डेकर, सौ.रामेश्वरी मगर आदी उपस्थित होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज व थोर कवी आदरणीय कुसुमाग्रज यांना पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. यावेळी विनोद सातार्डेकर यांनी ‘मराठी भाषेचा इतिहास व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थांनी केले.
जि.प.केंद्रशाळा मसुरे नं.१ येथे मराठी राजभाषा दिन साजरा संपन्न
