*चक्क मुकादमने मणेरी येथे दिले फेकून*
*💫दोडामार्ग दि२८सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून अनेक अप्रिय घटना घडत असून आज जिलेटिन सारख्या स्फोटकाच्या स्फोटात दोन परप्रांतीय युवक जखमी झाले आहेत. त्यांना मणेरी या ठिकाणी मुकादमने आणून रस्त्याच्या बाजूला फेकले. ही गोष्ट शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांना समजताच त्यांनी लागलीच त्याठिकाणी जात उपतालुकाप्रमुख सज्जन धाऊसकर यांसह ग्रामस्थानच्या मदतीने दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले व याची खबर दोडामार्ग पोलीस स्टेशनला देण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली. याबाबत दोडामार्ग पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व पोलीस हवालदार अनिल पाटील हे अधिक तपास करत असून ही घटना कुठे व कधी घडली याची अधिक माहिती उपलब्ध नसून या परप्रांतीय कामगारांच्या मुकादमाचा शोध पोलीस घेत आहेत. तर या जखमींची प्रकृती गंभीर असल्याने दोडामार्ग हॉस्पिटलमध्ये डॉ एवळे यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोव्यात हलवले आहे.
