*आमदार राम कदम यांनी व्यक्त केला विश्वास*
सावंतवाडी-: नगरपरिषद तर्फे जिमखाना मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेत आज आमदार राम कदम यांनी भेट दिली होती यावेळी त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एकातरी खेळाडूची निवड भारतीय संघात निश्चित होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
