*💫मालवण दि२८-:* मराठी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती निमित्त व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मालवणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यावतीने आज मालवण शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच मालवण मध्ये सर्व अनेक दुकानधारकांना व व्यापाऱ्यांना राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणारे व व्यवहारात जास्तीत जास्त मराठी वापरण्यास सांगणाऱ्या आशयाचे पत्रके वाटण्यात आली. तर तारकर्ली येथे सुंदर हस्ताक्षर व निबंध स्पर्धा घेण्यात आली. मालवण मनसेच्या या उपक्रमाचे सर्व शिक्षक, व्यापारी तसेच मालवणवासीयांनी कौतुक केले.
मालवणात मनसेतर्फे मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा….
