*💫मालवण दि.२८-:* मालवण शहरातील मक्रेबाग येथील प्रसिध्द लाकूड कारखानदार मोहन श्रीधर वराडकर (वय८१) यांचे रविवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. मातृत्व आधार फाऊंडेशनचे संचालक संजय उर्फ बंटी आणि सुनील वराडकर यांचे वडील होत. मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
लाकूड कारखानदार मोहन वराडकर यांचे निधन…
