*टेनिस बॉल नगराध्यक्ष चषकावर एल एस एस नेमळे संघाने कोरले नाव

*तर आदि आर्यन देवली संघ उपविजेता*

*💫सावंतवाडी दि२८-:* सावंतवाडी जिमखाना मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य टेनिस बॉल नगराध्यक्ष क्रिकेट चषकावर एल एस एस नेमळे संघाने नाव कोरले आहे. तर आदि आर्यन देवली संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात नेमळे संघाने उत्कृष्ट अशी गोलदाजीच्या जोरावर ८ धावांनी विजय मिळवला आहे. यावेळी सामना संपल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते ज्येष्ठ खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे.

You cannot copy content of this page