*💫वेंगुर्ला दि.२८-:* वेंगुर्ला आगारातील वाहक शंकर सावंत हे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा चालक, वाहक यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. अहोरात्र सेवा बजावणारे, इंटक संघटनेचे कट्टर व धडाडीचे कार्यकर्ते अशी सावंत यांनी आपली ओळख निर्माण केली होती. आज ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला आगार इंटक संघटनेचे सचिव संदिप चिचकर, खजिनदार आशिष खोबरेकर, उपाध्यक्ष दाजी तळवणेकर, संघटक सचिव मनोज दाभोलकर, सुरक्षा रक्षक परब आदी उपस्थित होते. यावेळी शंकर सावंत यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस इंटक संघटनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
वेंगुर्ला आगाराचे वाहक शंकर सावंत सेवानिवृत्त…
