Headlines

उन्नयन योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे – स्मिता दामले…

*💫वेंगुर्ला दि.२८-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन भाजपच्या वेंगुर्ला महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकारच्या उद्योगांसाठी २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले आहे. याच पॅकेजच्या माध्यमातून बचत गटात काम करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ५ वर्षे कालावधीसाठी सरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्थापित समुह जे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायामध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या व्यवसाय वृद्धीकरिता बीज भांडवल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग हा नोडल विभाग व कृषी आुयक्तालय, पुणे हे नोडल एजन्सर म्हणून काम पहाणार आहेत, असे दामले यांनी सांगितले. समुदाय संस्थेसाठी बीज भांडवल पूर्णतः अनुदान स्वरुपात असून लाभ घेणाऱ्या समुह सदस्यांसाठी हे बिज भांडवल वार्षिक ३ टक्के व्याज दराने कर्ज स्वरुपात असणार आहे. या कर्जाचा परतावा करताना व्याजाची विभागणी १ टक्के स्वयंसहाय्यता समुह, १ टक्के ग्रामसंघ व १ टक्के प्रभागसंघ या स्वरुपात असणार आहे.

You cannot copy content of this page