मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे असे संशोधकांचेही मत-डॉ.लिगवत….

*💫वेंगुर्ला दि.२८-:* आयुष्याच्या सुरुवातीला सहज आत्मसात केलेली भाषा नैसर्गिक क्षमतेचे अधिष्ठान असल्यामुळे मानवी मेंदूत ध्रुवस्थान निर्माण करुन विचार, कल्पना, समस्या निवारण यासाठी प्रभावी साधन ठरते. म्हणून मातृभाषा हेच शिक्षणाचे मुख्य माध्यम असावे असे जागतिक शिक्षण शास्त्रज्ज्ञ व संशोधक यांचेही मत आहे, असे प्रतिपादन डॉ. संजीव लिगवत यांनी केले. वेंगुर्ला येथील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. के. जी. केळकर, उपप्राचार्य डॉ. पूजा कर्पे, डॉ. श्रीराम हिर्लेकर, डॉ. सतीश पाटील, डॉ. संगीता मुळे, डॉ. दीपाली देसाई आदी उपस्थित होते. मराठी ही आपली मातृभाषा असल्याने आपापसातील स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला या भाषेचाच आधार घ्यावा लागतो, असे प्राचार्य डॉ.केळकर यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पुजा कर्पे, ग्रंथपाल निखिता डगरे, महादेव परब, मानस घाग यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक स्नेहल गोसावी, स्वागत श्रीकृष्ण जानकर, सूत्रसंचालन मैथिली सावंत यांनी तर आभार मनाली शिवलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार नार्वेकर, विशाल खांडेकर, जयसुर्या जामकर यांनी विशेष प्रयत्न केले.

You cannot copy content of this page