युवा पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगावा-:डॉ. श्रीनिवास गावडे…

*💫वेंगुर्ला दि.२८-:* युवा पिढीने मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे आणि ती जतन करण्याकरीता प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा युथ अध्यक्ष डॉ. श्रीनिवास गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले. मराठी भाषा दिनानिमित्त वेंगुर्ला तालुका युथच्यावतीने पाटकर हायस्कूल येथे कविवर्य कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा युथ अध्यक्ष डॉ. श्रीनिवास गावडे, मुख्याध्यापक प्रकाश जाधव व शिक्षक तसेच युथ संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page