*💫मालवण दि.२८-:* वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल या प्रशालेत भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सहखजिनदार अभिमन्यू कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा व शिष्यवृत्ती बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी ऍड. दीपाली हडकर यांच्या अर्थसाहाय्यातून २५० वेंगुर्ला टी- ९ ही नवीन प्रजातीच्या काजू कलमाच्या रोपांचे मुलांना वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेत कमलाकर हडकर यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर प्रशालेला इन्व्हर्टर भेट देणाऱ्या भंडारी ए. सो. हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया टिकम यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक जे. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक श्री. कुबल यांनी केले. तर आभार सौ. दळवी यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी शुभेच्छा दिल्या.
शांतादुर्गा प्रशालेच्या मुलांना नवीन प्रजातीच्या काजू कलमांचे वाटप..
