Headlines

Global Maharashtra Breaking News

८० फूट पाण्याच्या टाकीवरून पडून युवकाचा मृत्यू

मालवण गवंडीवाडा येथील दुर्दैवी घटना *⚡मालवण दि.१०-:* मालवण भरड येथील मयुरेश अरुण मालंडकर हा ३५ वर्षीय युवक पाणी साठवणूकीच्या टाकीवरून सुमारे ८० फूट उंचीवरून जमिनीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी मालवण गवंडीवाडा येथे घडली आहे. याबाबत पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत दरम्यान, मयुरेश याने आत्महत्या…

Read Full News

दक्षता व नियंत्रण समितीवर अजित कांबळे यांची निवड

देवगड तालुक्यातून मिळाला सन्मान *⚡देवगड ता.१०-:* अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर देवगड तालुक्यातून सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीची सभा दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी११ वा. वाजता कणकवली तहसीलदार कार्यालय येथे पार पडली. देवगड तालुक्यातील अनुसूचित…

Read Full News

गुरुवारी देवगडमध्ये रानभाजी महोत्सव

*⚡देवगड ता.१०-:* महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पंचायत समिती देवगड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान देवगड (उमेद) यांचे संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाजी महोत्सव गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कै मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात स्थानिक उपलब्ध होणाऱ्या पावसाळा सुरू…

Read Full News

सुंदर सावंतवाडी वसविणाऱ्या राजे खेम सावंत यांचा पुतळा उभारा

सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, इतिहास अभ्यासक डॉ जी ए बुवा व सुनील सावंत यांची मागणी;मुख्याधिकारी जावडेकर यांना दिले निवेदन *⚡सावंतवाडी दि.१०-:* सुंदरवाडी सावंतवाडी शहराची ४०० वर्षापूर्वी निर्मिती करणारे सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत यांच्या पुतळा स्वरूपी स्मारक शहरात व्हावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक वसंत…

Read Full News

वैभववाडी तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण होणार कॅन्सरमुक्त-केमिकलमुक्त सेंद्रिय शेती करणार

प्रगती पालांडे व पंढरीनाथ पवार यांनी दिली माहिती *⚡वैभववाडी दि.१०-:* तालुक्यात “स्वच्छ इंधन-बायो फ्यूऐल,कॅन्सरमुक्त-केमिकलमुक्त सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय येथील जैविक उत्पादक कंपनीने घेतला आहे.त्यामुळे याठिकाणी आता इंधनाचे मळे फुलणार आहेत.याबाबतची माहिती कंपनीच्या संचालिका प्रगती पालांडे आणि उद्योग विकास सहाय्यक पंढरीनाथ पवार यांनी दिली.एमसीएल अंतर्गत मीरा क्लीन फ्यूएल लिमिटेड या केंद्र सरकारच्या मान्यतेने हा प्रकल्प होणार…

Read Full News

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण भागातील एस टी बससेवा सुरू करा

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची सावंतवाडी आगारप्रमुखांकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.१०-:* गणेशोत्सवा पूर्वी ग्रामीण भागातील एसटी बससेवा सुरू करा या मागणीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी सावंतवाडी आगारप्रमुखांची भेट घेत निवेदन दिले आहे. या निवेदनात असे म्हटले की श्रावण महिन्यात अनेक छोटे मोठे सण उत्साहात साजरे केले जातात गणेशोत्सवात अनेक चाकरमानी कोकणात येतात गणेशोत्सवाच्या काळात अनेक…

Read Full News

कळसुली तलाठी यांची बदली रद्द करा

कळसुली भाजपा शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांकडे केली मागणी *⚡कणकवली दि.१०-:* कळसुली/शिरवल येथे तलाठी म्हणून काम करणाऱ्या तलाठी एस. आर. बावलेकर यांची बदली करण्यात येऊ नये. त्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कळसुली भाजप शिष्टमंडळाच्यावतीने कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन देऊन करण्यात आली. तलाठी एस. आर. बावलेकर या कळसुली/शिरवल येथे तलाठी या पदावर काम करीत…

Read Full News

जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात,कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर

भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांची ठाकरे सरकारवर टीका *⚡कणकवली दि.१०-:* केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या फसवणुकीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अतिवृष्टी, वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच 160 कोटींची उधळपट्टी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे निलेश राणे यांनी एका…

Read Full News

संस्कारी माणसांनी युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे

गोपुरी आश्रमात सहविचार बैठकीत धाकू तानवडे यांचे आवाहन *⚡कणकवली दि.१०-:* समाजातील संस्कारी मंडळींनी भविष्यातील युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे. आज युवकांची चांगल्या संस्कारांच्या दृष्टीने सक्षम मानसिकता तयार करण्यासाठी या मंडळींची आवश्यकता आहे. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून हे काम स्वातंत्र्य पूर्व आणि स्वतंत्र्योतर काळात सुरू होते. आजही ते सुरू आहे, असे प्रतिपादन विद्यामंदिर प्रशालेचे माजी शिक्षक…

Read Full News

वागदे कसवण -तळवडे रस्ता दुरुस्त करा

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी वेधले लक्ष *⚡कणकवली दि.१०-:* वागदे कसवण -तळवडे रस्ता वागदे येथे घाटीत खचला आहे.सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा तसेच येणाऱ्या काळात चतुर्थी हा अत्यंत महत्वाचा सण असल्याने एस.टी. वाहतुक सुरु होण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे त्यामुळे रस्ता दुरुस्त करावा,अशी मागणी राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी…

Read Full News

You cannot copy content of this page