देवगड तालुक्यातून मिळाला सन्मान
*⚡देवगड ता.१०-:* अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर देवगड तालुक्यातून सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीची सभा दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी११ वा. वाजता कणकवली तहसीलदार कार्यालय येथे पार पडली. देवगड तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीच्या जनतेस आवाहन करण्यात येते की, कुठेही आपल्यावर अन्याय किंवा अत्याचार होत असतील तर समिती सदस्य या नात्याने त्यांच्याशी संपर्क करावा. तसेच या समितीमार्फत दर 3 महिन्याने उपविभागीय स्तरावरील असणाऱ्या या संदर्भातील प्रकरणाचा आढावा घेतला जाईल. व या बाबतीत पीडित असणाऱ्या व्यक्तींना शासनाकडून मिळणारे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. अशा प्रकरणात आपल्याला पोलीस खात्याकडून कुठल्याही प्रकारे सहकार्य मिळत नसल्यास समिती सदस्य या नात्याने त्यांच्याशी संपर्क साधावा करावा.असे आवाहनही अजित कांबळे यांनी केले आहे.
