८० फूट पाण्याच्या टाकीवरून पडून युवकाचा मृत्यू

मालवण गवंडीवाडा येथील दुर्दैवी घटना

*⚡मालवण दि.१०-:* मालवण भरड येथील मयुरेश अरुण मालंडकर हा ३५ वर्षीय युवक पाणी साठवणूकीच्या टाकीवरून सुमारे ८० फूट उंचीवरून जमिनीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी मालवण गवंडीवाडा येथे घडली आहे. याबाबत पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत दरम्यान, मयुरेश याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा शहरात सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार, मालवण भरड येथे राहणारा मयुरेश हा काल रात्री पासून घरात कोणाला न सांगता निघून गेला होता अशी चर्चा सुरू होती त्यामुळे मयुरेश त्याचे कुटुंबीय शोध घेत होते. आज दुपारच्या सुमारास गवंडीवाडा येथील नळपाणी योजनेच्या पाणी साठवण टाकीवरून मयुरेश हा जमिनीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाला तर पाण्याच्या टाकीला नायलॉनची दोरी बांधलेली आढळून आली आहे मालवण पोलिसांनी मयुरेश मालंडकर याच्या मृत्यूबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक श्री. सचिन पाटील, भारत फारणे, हवालदार राजन पाटील, सिद्धेश चिपकर, श्री. पांचाळ हे अधिक तपास करीत आहेत. मयुरेश याच्या मृत्यूमुळे मित्र परिवार शोकाकुल झाला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page