गुरुवारी देवगडमध्ये रानभाजी महोत्सव

*⚡देवगड ता.१०-:* महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पंचायत समिती देवगड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान देवगड (उमेद) यांचे संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाजी महोत्सव गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कै मो.ज.गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात स्थानिक उपलब्ध होणाऱ्या पावसाळा सुरू झाल्यावर तयार होणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. रानभाज्यांच्या आहारातील महत्त्व त्यांच्या आयुर्वेदिक गुणधर्म याची माहिती सर्वसामान्यांना मिळणार आहे.. तसेच त्यांची पाककृती देखील पाहण्याची संधी या रानभाजी महोत्सवात मिळेल .या महोत्सवाचे उदघाटन देवगड पंचायत समिती सभापती लक्ष्मण पाळेकर यांच्या हस्ते होणार असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग सिद्धांना म्हेत्रे एस एस हजारे उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली, आत्मा शेतकरी सल्ला समिति देवगड सदस्य उपस्थित रहाणार आहेत .रानभाजी विषयी सविस्तर माहिती देणे साठी संदीप राणे रानभाजी तज्ञ उपस्थित राहणार असून सदर रानभाजी महोत्सवास जास्तीत जास्त शेतकरी ग्राहक यांनी प्रदर्शनास भेट द्यावी. असे आवाहन शेतकरी सल्ला समिति(आत्मा) चे अध्यक्ष महेश पाटोळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page