सुंदर सावंतवाडी वसविणाऱ्या राजे खेम सावंत यांचा पुतळा उभारा

सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, इतिहास अभ्यासक डॉ जी ए बुवा व सुनील सावंत यांची मागणी;मुख्याधिकारी जावडेकर यांना दिले निवेदन

*⚡सावंतवाडी दि.१०-:* सुंदरवाडी सावंतवाडी शहराची ४०० वर्षापूर्वी निर्मिती करणारे सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत यांच्या पुतळा स्वरूपी स्मारक शहरात व्हावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, इतिहास अभ्यासक डॉ. जी. ए. बुवा तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत यांनी नगराध्यक्षांना आज निवेदन सादर केले. हे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे नगरसेवक मनोज नाईक यांच्या उपस्थितीत सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी ही चऱ्हाठा गावची इटकुली “सुंदरवाडी” आहे. नरेंद्र डोंगराच्या हिरव्यागार डौलदार अशा नटलेल्या सावंतवाडी शहरामध्ये सुंदरवाडी खेम सावंत यांनी वसवली आहे. खेम सावंत यांनी सुंदर परिसराचे कोंदण असलेल्या नरेंद्र डोंगराच्या तटबंदीचे संरक्षक भिंत कडे व निसर्ग, पाणी,झरे, उंच-सखल रूप चिकित्सकपणे न्याहाळून सुंदरवाडी वसवली असा उल्लेख १६९१-१६९२ मधील कागदपत्रात आढळतो. सुंदरवाडी सावंतवाडी म्हणून अधोरेखित केल्याचे जाणवते. १८५२ मधील श्रीराम वाचन मंदिराच्या शिळाप्रेस मुद्रणात कोरलेले घटना. मात्र सुंदरवाडी असाच उल्लेख दिसत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. सावंत यांनी वसवलेली प्रशासकीय राजधानी हळूहळू सावंतवाडी झाली ती त्यांच्या येथील अधिपत्याखाली अशा सुंदर निसर्गाचा संरक्षित क्षेत्रात सावंतवाडी वसवली आहे. या सुंदरवाडी-सावंतवाडी मध्ये राज घराण्याशी संबंधित सेवकांच्या वस्त्या देखील वसवल्या असून प्रत्येक वस्त्यांमध्ये राज घरण्याच्या संबंधित अशा लोकांना स्थान दिले होते या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे. सुंदरवाडीची स्थापना एका राजधानीच्या नगरात करून अध्यात्मिक उंची सर्व साहित्य आणि कला परंपरेने जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणाऱ्या खेम सावंत यांचे स्मारक या नगरीत असणे हे सावंतवाडीला भूषण आहे. या संदर्भात वेगवेगळ्या काळात मध्ये नगरपालिका सर्व शैक्षणिक सामाजिक संस्था मधून चर्चाही झाली पण स्मारक प्रत्यक्षात अजून झाले नाही अशा या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे स्मारक पुतळा स्वरूपात उभे करण्याचे कार्य नगरपालिकेकडून विचारात घेतल्यास ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरेल आणि सुंदरवाडी सावंतवाडी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे सर्वदूर पोहोचेल असे या निवेदनामध्ये श्री केसरकर यांनी म्हटले आहे. सावंतवाडी संस्थानचे वैशिष्ट्ये जपणे हे कोकण परिसरातील पर्यटनचा विचार करता आज अत्यंत महत्त्वाचे व मूलभूत असल्याने या इतिहासिक स्मारक करीता नगरपालिके बरोबर नागरिक इतिहास प्रेमींनी पुढे येणे गरजेचे असल्याचे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page