कळसुली भाजपा शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांकडे केली मागणी
*⚡कणकवली दि.१०-:* कळसुली/शिरवल येथे तलाठी म्हणून काम करणाऱ्या तलाठी एस. आर. बावलेकर यांची बदली करण्यात येऊ नये. त्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कळसुली भाजप शिष्टमंडळाच्यावतीने कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन देऊन करण्यात आली. तलाठी एस. आर. बावलेकर या कळसुली/शिरवल येथे तलाठी या पदावर काम करीत आहेत. त्या यापूर्वी कळसुली व कळसुली उपनगर (दोन सजा) या गावांचा कारभार पाहत आहेत. त्या आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि वेळेत करत आहेत. त्यामुळे त्यांची बदली करण्यात येऊ नये. त्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कळसुली भाजप शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी कळसुली उपसरपंच सचिन पारधिये, ग्रा. पं. सदस्य अरुण दळवी तसेच राजेंद्र तांबे, लक्ष्मण घाडीगावकर, सुहास परब, साक्षी तांबे, स्वप्नील गोसावी आदी उपस्थित होते.
