राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी वेधले लक्ष
*⚡कणकवली दि.१०-:* वागदे कसवण -तळवडे रस्ता वागदे येथे घाटीत खचला आहे.सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा तसेच येणाऱ्या काळात चतुर्थी हा अत्यंत महत्वाचा सण असल्याने एस.टी. वाहतुक सुरु होण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे त्यामुळे रस्ता दुरुस्त करावा,अशी मागणी राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक म्हणतात,चालू वर्षी जुलै २२ ते २५/२०२१ च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे उपरोक्त विषयाकिंत ठिकाणी भुस्खलन झाले असून रस्त्याच्या मधोमध जवळजवळ साडेतीन ते चार फुट एवढा भाग खचला आहे . त्यामुळे एस.टी.ची वाहतुक पूर्णपणे बंद आहे . येणाऱ्या काळात चतुर्थी हा अत्यंत महत्वाचा सण असल्याने एस.टी. वाहतुक सुरु होण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे . कारण एस.टी. प्रवास हाच सर्व सामान्यांसाठी वाहतुकीचा मार्ग आहे . तसेच कायम स्वरुपी उपाययोजनेसाठी ओहाळाच्या बाजूने सरंक्षक भिंत होणे गरजेचे आहे . तसेच घाटीच्या वरचा चढावाचा भाग कमी करणे गरजेचे आहे . तरी सदर कामाच्या बाबतीत आपण जातीने लक्ष घालून त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी अबिद नाईक यांनी केली आहे. यावेळी दिलीप वर्णे , इब्राहिम शेख,अमित केतकर, विशाल ठाणेकर, सतीश पाताडे,कसवण-तळवडे सरपंच गीता तेली, विलास गावकर, माजी सरपंच प्रमोद तेली,सखाराम घाडीगावकर, महेंद्र गावकर, माजी सरपंच प्रियांका पालव,सुनील मेस्त्री,चंद्रकांत सावंत, अरविंद पालव,सचिन हरमळकर,कसवण तळवडे ग्रामस्थ उपस्थित होते.
