Headlines

Global Maharashtra Breaking News

मळेवाड – राणेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर वर्धापन दिन ९ रोजी…

⚡सावंतवाडी ता.०८-: मळेवाड (राणेवाडी ) येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर वर्धापनदिन गुरुवार दिनांक ९ एप्रिल रोजी आयोजित केला असून यानिमित्तानेश्री ब्राह्मणदेव मंदिर राणेवाडी येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९:०० ते १० :०० वाजता पूजा व अभिषेक सकाळी १०:३० ते दु.१२:३० श्री सत्यनारायण महापूजा व कथा वाचन ,दुपारी १२:३० ते १ :००महाआरती आणि तीर्थप्रसाद ,दुपारी…

Read Full News

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा…

भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले येथील रुग्णालयात रूग्णांना फळेवाटप कार्यक्रम संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०८-: भाजप स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आम.रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशालजी परब यांच्या संकल्पनेतून रेडी ग्रामपंचायत हद्दीतील रेडकर हॉस्पिटल येथे नवनिर्वाचित सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर केरकर, जगन्नाथ राणे , गजानन बांदेकर ,…

Read Full News

हळवल भाकरवाडी येथे अज्ञाताकडून बागांना आग…

⚡कणकवली ता.०८-: तालुक्यातील हळवल भाकरवाडी येथे अज्ञात व्यक्तीकडून बागांना आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत काजूच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाकरवाडी परिसरातील काजू बागांना अचानक आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. आगीची तीव्रता मोठी असल्याने काजूची झाडे जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग अज्ञात…

Read Full News

मालवणात रिक्षाचालकांसाठी २ लाखांचा विमा…

खासदार राणे यांच्या अमृत महोत्सवी उपक्रमातून मदतीचा हात: शिंदे शिवसेनेचा पुढाकार.. ⚡मालवण ता.०७-: माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांचा २ लाख रुपयांचा विमा उतरण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या १०० रिक्षा चालकांना प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी विमाधारक ६० वर्षांच्या आतील…

Read Full News

वेंगुर्ला येथे 11 व 12 रोजी  भव्य आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.७-: भाजपा नेते माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ११ व १२ एप्रिल रोजी “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांच्या वतीने भव्य खुली पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना…

Read Full News

वेंगुर्ला येथे भारतीय जनता पक्षाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा​…

⚡वेंगुर्ला ता.०७-: भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ला शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून आणि विविध उपक्रम राबवून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.“भाजपा म्हणजे केवळ राजकीय पक्ष नसून तो राष्ट्रसेवेचा, विचारांचा आणि समर्पणाचा अखंड प्रवास आहे,” अशा भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.​शून्यातून विश्वनिर्मिती आणि संघर्षाचा गौरव :६ एप्रिल १९८० रोजी शून्यातून स्थापन झालेल्या…

Read Full News

रेवंडी प्रवासी जेटी वरील बेकायदेशीर मासळी वाहतूक बंद करा..!

कालावल खाडीपात्रातील वाळूसदृष्य गाळ उपसा लिलाव प्रक्रिया तातडीने राबवा:येत्या आठ दिवसात लिलाव प्रक्रिया न झाल्यास आंदोलन छेडण्याचा रेवंडी ग्रामस्थांचा इशारा.. ⚡मालवण ता.०७-:रेवंडी प्रवासी जेटी वर बेकायदेशीर रित्या मासे उतरविणे तात्काळ बंद करा. प्रवासी जेटीचा गैरवापर रोखण्यासाठी स्थानिक व परिसरातील इतर ग्रामस्थांना स्पष्ट सूचना देऊन निर्बंध लागू करावेत.अश्या मागणीसह, रेवंडी गावाच्या परिसरातील कालावल खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर…

Read Full News

कालावल खाडीत महिलांचे आंदोलन तीव्र; पाण्यात उतरून प्रशासनाविरोधात संताप…

⚡मालवण ता.०७-:कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाचे स्वरूप आज अधिकच तीव्र बनले. मागण्या पूर्ण न झाल्यास खाडीपात्रात उड्या घेऊन जीवन संपवू असा इशारा देणाऱ्या तळाशीलच्या महिलांनी अखेर आज प्रशासनाशी चर्चा फिसकटल्याने सायंकाळी खाडीपात्रात उतरत आंदोलन अधिक तीव्र केले. यावेळी पाण्यात उतरलेल्या महिलांपैकी एक ज्येष्ठ महिला अत्यवस्थ बनल्याने…

Read Full News

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांची रायगडावर ट्रेकिंग मोहीम…

⚡मालवण ता.०७-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागामार्फत ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर यशस्वी ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली. साहसी व शिस्तीचे धडे देणाऱ्या या उपक्रमात एकूण २९ विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते. एनसीसी विभागामार्फत दरवर्षी विविध ठिकाणी ट्रेकिंग कॅम्प आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, कठोर परिश्रमाची सवय, शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रतिकूल…

Read Full News

सीटीईटी परीक्षेत डी.एड. कॉलेज मालवणच्या विद्यार्थ्यांचे सुयश…

⚡मालवण ता.०७-:केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२६ च्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत डी.एड. कॉलेज मालवणच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल ३० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजमधील संग्राम सतीश कासले, मानसी…

Read Full News

You cannot copy content of this page