रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा…

भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले येथील रुग्णालयात रूग्णांना फळेवाटप कार्यक्रम संपन्न..

⚡सावंतवाडी ता.०८-: भाजप स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आम.रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशालजी परब यांच्या संकल्पनेतून रेडी ग्रामपंचायत हद्दीतील रेडकर हॉस्पिटल येथे नवनिर्वाचित सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.

यावेळी ज्ञानेश्वर केरकर, जगन्नाथ राणे , गजानन बांदेकर , संदीप बुज्जी , महेश कोनाडकर , प्रसाद रेडकर , देवेंद्र राऊळ , अरुण राणे तसेच भाजपा चे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा भाजपाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापना दिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम करण्यात आला.

You cannot copy content of this page