हळवल भाकरवाडी येथे अज्ञाताकडून बागांना आग…

⚡कणकवली ता.०८-: तालुक्यातील हळवल भाकरवाडी येथे अज्ञात व्यक्तीकडून बागांना आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत काजूच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाकरवाडी परिसरातील काजू बागांना अचानक आग लागल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. आगीची तीव्रता मोठी असल्याने काजूची झाडे जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page