मळेवाड – राणेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर वर्धापन दिन ९ रोजी…

⚡सावंतवाडी ता.०८-: मळेवाड (राणेवाडी ) येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर वर्धापनदिन गुरुवार दिनांक ९ एप्रिल रोजी आयोजित केला असून यानिमित्ताने
श्री ब्राह्मणदेव मंदिर राणेवाडी येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९:०० ते १० :०० वाजता पूजा व अभिषेक सकाळी १०:३० ते दु.१२:३० श्री सत्यनारायण महापूजा व कथा वाचन ,दुपारी १२:३० ते १ :००महाआरती आणि तीर्थप्रसाद ,दुपारी १:०० वा.पासून महाप्रसाद तसेच रात्रौ ९ :००वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ब्राह्मणदेव प्रासादिक कला क्रीडा मंडळ व ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page