Headlines

पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा समितीच्या वतीने जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार…

⚡बांदा ता.०८-: पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या जिल्हा समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची ही सदिच्छा भेट घेण्यात आली. सदर भेट ही जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी येथे त्यांच्या अध्यक्षीय दालनात घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पतंजली योग समिती, सिंधुदुर्ग मार्फत जिल्हाभरात होत असलेल्या योगप्रचार आणि प्रसाराविषयीसुद्धा त्यांच्यासमवेत पतंजलीच्या जिल्हा समितीने सविस्तर चर्चा केली. त्यावेळी जो योगाचा प्रचार आणि प्रसार जिल्हाभरात सुरू आहे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी ग्वाही दिली.
याप्रसंगी जिल्हाभरात सध्या सुरू असलेल्या सहयोग शिक्षण प्रशिक्षणासाठी सन्माननीय प्रमोद कामत यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर, जिल्हा महामंत्री विकास उर्फ विकी केरकर, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण पावसकर, युवा भारत जिल्हा प्रभारी डॉ. प्रशांत परब, भारत स्वाभिमान कुडाळ तहसील प्रभारी योगेश गवंडे आणि पतंजलीचे कर्मठ कार्यकर्ते रवींद्र वालावलकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते . जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याबद्दल त्यांचे पतंजली योग समिती सिंधुदुर्गतर्फे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page