सीटीईटी परीक्षेत डी.एड. कॉलेज मालवणच्या विद्यार्थ्यांचे सुयश…

⚡मालवण ता.०७-:
केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२६ च्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत डी.एड. कॉलेज मालवणच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल ३० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजमधील संग्राम सतीश कासले, मानसी विवेक खडपकर, दीक्षा दिनेश चव्हाण, सेजल वासुदेव राणे, गौरांगी महेश काळसेकर यांनी पहिल्याच प्रयत्नात सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना डीएड कॉलेजमधील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कृष्णराव सिताराम देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, शालेय समितीचे अध्यक्ष महादेव पाटकर, प्राचार्य हेमंत प्रभू, इतर पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page