९ एप्रिल ला रंगणार सांगीतिक जल्लोष.!.
कणकवली : दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय दर्पण आयडॉल २०२६ कराओके गीतगायन स्पर्धेची महाअंतिम फेरी गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रम मराठा मंडळ नाट्यगृह, कणकवली येथे होणार आहे.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत गायक-गायिका सहभागी होणार असून, नामवंत परीक्षकांच्या उपस्थितीत अंतिम फेरी रंगणार आहे. सांगीतिक आविष्कारातून कलागुणांना वाव देणारा हा सोहळा ठरणार आहे.
दरम्यान, संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार स्मृती दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास नवजीवन ब्लड सेंटर यांचे सहकार्य लाभणार आहे. रक्तदान… महादान… गरजवंताला देऊया जीवनदान! असा संदेश देत नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरासाठी संपर्क : ९४२२३७३५९० / ९४०४९२१२२३ / ७७४४०७३७९१ / ७५८८४४९७६३
या कार्यक्रमाचे आयोजन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग व कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
